Breaking News

सर्वपक्षिय बैठकीत होणार आठवडाभऱाच्या लॉकडाऊनवर शिक्कमोर्तब? शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षिय नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्या शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा करून शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून राज्यात सातत्याने ५० हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच पहिल्या चार दिवसानंतर कडक निर्बंध लागू केले तरी कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे किमान आठवडाभराचा लॉकडाऊन जाहिर करून वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याचा विचार महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसेच आठवड्याच्या लॉकडाऊन लागू केल्यानंतरही जर कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली नाही तर त्यात वाढही होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे अबु आजमी यांच्यासह अनेक लहान-मोठ्या पक्षांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण हे सध्या देण्यात येत असलेल्या लसी या एक आहेत. या लसीकरणांची सुरूवात झाल्यानेच नागरीक पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच त्याचा संसर्गही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीने लस घेतली असेल तर त्याचे कुटुंब आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींही कोरोना बाधित होत असल्याचे सध्या प्राथमिक अवस्थेत जाणवत आहे. मात्र त्यास अद्याप वैज्ञानिक आधार मिळाला नाही. त्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवडा भराच्या लॉकडाऊननंतर याबाबतचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. मात्र बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा आठभराचा लॉकडाऊन लागू करण्याचे जवळपास निश्चित असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *