Breaking News

काँग्रेसचे मंत्री म्हणाले …तर भाजपा नेत्यांचे आम्ही अभिनंदन करू केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत!: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना  पाठोपाठ अतिवृष्टीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र राज्यातल्या भाजपा नेत्यांनी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे अडकलेले राज्याच्या हक्काचे ३० हजार कोटी रूपये आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करून आणावा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले.

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे तो अद्याप केलेलाच नाही. परंतु सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य सरकारला पगार आणि इतर दैनंदीन खर्चासाठी लागणारा ५५ हजार कोटी रुपयांचा निधी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारला आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रीया सुरु असून परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल परंतु सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते. परंतु राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो. राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मदत करणारच आहे. राज्यातील भाजपाचे नेते मोठ्या मोठ्या मागण्या करत आहेत पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत यासाठी प्रयत्न करत नाहीत. हे जीएसटीचे पैसे तसेच राज्याला केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यांनी प्रयत्न करून भरघोस निधी आणावा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *