Breaking News

परमबीर सिंग यांना चंदीगढ येथून अटक करून माझ्यासमोर उभे करा ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश

ठाणेः प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीं रूपयांची खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना अटक करून हजर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जे.तांबे यांनी आज जारी केले.
ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी परमबीर सिंग यांच्या विरोधात भारतीय दंडविधान खाली ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०६, ५०६ (२), १६६, १०९, १२० ब, शस्त्र कायद्याखाली ३, २५ खाली गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी त्यांच्या ठाणे कोर्टात खटलाही सुरु आहे. या खटल्यात त्यांना वेळोवेळी समन्स बजावूनही ते हजर झाले नसल्याने अखेर ठाणे न्यायालयाने परमबीर सिंग यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे परमबीर सिंग यांनी चंदीगढ येथील पत्यावरून आपले म्हणणे सादर केल्यामुळे सिंग यांना चंदीगढ येथून अटक करून हजर करण्याचे आदेश दिले.
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत यासंदर्भातील सीबीआय मार्फत तपास करून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने सिंग यांची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांच्याच आरोपाच्या आधारे अॅड.सदावर्ते यांच्या पत्नीने दाखल केलेली याचिकेवर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयकडून प्राथमिक अहवाल सादर करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कारवाई सुरु केली.
दरम्यानच्या काळात भाजपानेही अनिल देशमुख यांच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरूध्द भाजपा अशी लढाई सुरु झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
मात्र आता न्यायालयानेच परमबीर सिंग यांच्या अटकेचे आदेश दिल्याने विशेषतः ज्या ठाणे शहराचे ते पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले तेथील न्यायालयानेच त्यांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिल्याने भाजपाही आता बॅकफूटला गेल्याचे दिसून येत आहे.

ठाणे न्यायालयाने जारी केलेले हेच ते आदेशः-

Check Also

अनिल देशमुख आणखी १४ दिवस तुरूंगात विशेष न्यायालयाने सुणावली न्यायालयीन कोठडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *