Breaking News

गडचिरोलीतल्या नुकसानीची तेलंगणाकडून भरपाई घेवू जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
गडचिरोलीत धरणाचे पाणी जास्त येवून नुकसान झाले असेल तर त्याबाबत तेलंगणा राज्याला कळविण्यात येईल. तसेच झालेली नुकसानभरपाईही त्यांच्याकडून घेतली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
तेलंगणा राज्यातील मेलीकट्टा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८-९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. मात्र तरीही शहरात पाणी जाण्याचा प्रकार होत असल्याने याविरोधात आमचे आमदार व नेते बाबा आत्राम हे आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. परंतु तेलंगणा राज्याने संपादित केलेली जमीन आहे. त्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त जमीनींचे नुकसान झाले असेल, पाणी आले असेल त्याविषयी तेलंगणा राज्याला कळविण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जेवढी पाण्याची उंची अडवण्याची आवश्यकता होती, त्यापेक्षा जास्त पाणी असेल तर मात्र गंभीर बाब आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही यासाठी देखील तेलंगणा राज्यासोबत त्वरीत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *