Breaking News

धुळे-नंदुरबार वगळता ५ जांगावर आघाडीची आघाडी अमरीश पटेलांचा एकतर्फी विजय

मुंबई: प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी तसेच ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झाले. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भाजपाचे अमरीश पटेल हे विजयी झाले. तर बाकिच्या ५ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे संध्याकाळी दिसून आले.
सुरूवातीला पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघात सुरुवातीला भाजपाचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र दुपारनंतर भाजपाच्या उमेदवारांची पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली आणि महाविकास आघाडी सरकारचे पाच उमेदवारांनी मतांमध्ये आघाडी घेतली.
अमरावती शिक्षक मध्ये पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे यांना धक्का; तर पुणे, औरंगाबाद मध्ये पदवीधरमध्ये महाविकास आघाडीवर!
अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात पहिली फेरीला, भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक ३१३१ मतांसह आघडीवर, तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना २३०० मते मिळाली आहेत.
औरंगाबाद पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली असून पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना दहा हजारांची आघाडी, भाजपचे शिरीष बोराळकर पिछाडीवर, पहिल्या फेरीची मतमोजणी अजूनही सुरूच, ५६ हजार मतांची पहिली फेरी.
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांची मुसंडी
पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात, प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी, भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.
धुळे नंदुरबार स्थानिक संस्थामध्ये महाविकास आघाडीची ११५ मते फुटली
धुळे नंदुरबार स्थानिक संस्था विधानपरिषद निवडणूक, अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे ११५ मत फुटली, भाजपची १९९ तर महाविकास आघाडीचे २१३ मतदान, मात्र, महाविकास आघाडीच्या ११५ मतदारांची मते फुटल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला, भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदारसंघ निहाय उमेदवार
पुणे पदवीधर अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्रामसिंह देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी )
शिरीष बोराळकर (भाजप)
नागोरराव पांचाळ( वंचित)
रमेश पोकळे (भाजप बंडखोर)
नागपूर पदवीधर
अभिजीत वंजारी (कॉग्रेस )
संदीप जोशी( भाजप)
नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार )
राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )
पुणे शिक्षक : जयंत आसगांवकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)
अमरावती शिक्षक : श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा
नितीन धांडे ( भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती)
प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *