Breaking News

कमी पटसंख्येच्या शाळांचे स्थलांतर केवळ विद्यार्थ्यांच्या हिताठीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विधान परिषदेत दावा

नागपूर: प्रतिनिधी

राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठी राज्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नव्हे तर स्थलांतरित करण्याचा करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत उत्तरा दाखल बोलताना केला.

विधानपरिषदेत नियम ९३ अन्वये कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे स्थलांतर करण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देते वेळी तावडे बोलत होते.

शाळांमध्ये ० ते २० पटसंख्या इतकी कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीतच घेण्यात आला होता. पण हा निर्णय आमच्या सरकारने अंमलात आणला नाही. त्यामुळे २० पटसंख्या असलेल्या सुमारे १२ हजार शाळा तर १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ५ हजार ६०० इतकी आहे. यापैकी सर्वच नाही तर ज्या शाळांची पटसंसख्या १० पेक्षा कमी असणार आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्याचबरोबर ज्या शाळांची पटसंख्या ४ व ५ म्हणजेच १० पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन होत नाही. तसेच त्या शाळेत क्रिडा स्पर्धा, गॅदरिंग होत नाही, त्यामुळे हा विद्यार्थी सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेपासून दूर राहतो. पण कमी पटसंख्या असलेल्या शाळेपासून जवळच्या ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ६५- ७० आहे, अशा शाळांमध्ये या विदयार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांचेही समायोजन करण्यात येणार आहे. जेणे करुन कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समविष्ट होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे हित जपले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *