Breaking News

१ ऑक्टोबरपासून टाटाची वाहने महागणार टाटा कंपनीने केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सची वाहने आता महागणार आहेत. आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली आहे. १ ऑक्टोबरपासून किमतीतील ही वाढ लागू होणार आहे.
टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती २ टक्क्याने वाढवणार आहे. किंमतीतील वाढ मॉडल आणि वाहनाच्या व्हेरिअंटवर आधारीत असणार आहे. स्टील आणि मौल्यवान धातू महाग झाल्याने वाहनांच्या किमती वाढवत असल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
टाटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, .पोलाद, मौल्यवान धातूंच्या वाढलेली किंमत यामुळे उत्पादनाची देखील किंमत देखील वाढवावी लागत आहे. कंपनीने या आधी उत्पादनाची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्राहकांना बजेटमध्ये वाहन उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मोटर्स प्रयत्नशील आहे.
कच्चा माल महाग झाल्यामुळे मागील काही महिन्यांपासून वाहन कंपन्या किंमतीमध्ये वाढ करत आहेत. हिरो मोटोकॉर्प आणि मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा आधीच केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिसऱ्यांदा किमती वाढवल्या. कंपनीने प्रवासी वाहनांच्या एक्स-शोरूम किमतीत सरासरी १.९ टक्के वाढ केली आहे. यापूर्वी मारूतीने जानेवारी आणि एप्रिलमध्ये एकूण किमती ३.५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या.
हिरो मोटोकॉर्पनेही यंदा आतापर्यंत तीन वेळा किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने सप्टेंबरमध्ये मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत ३ हजार रुपयांची वाढ केली होती. तर जानेवारीत १५०० रुपयांनी आणि एप्रिलमध्ये २५०० रुपयांनी वाढ केली होती.
दरम्यान, टाटा मोटर्सची विक्री चांगलीच वाढली आहे. ऑगस्टमध्ये विक्रीत तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये कंपनीने ५४,१९० वाहने विकली आहेत. तर ऑगस्ट २०२० मध्ये ३५,४२० वाहने विकली होती. टाटाच्या प्रवासी वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये २८,०१८ इतकी होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात विक्रीचा आकडा १८,५८३ होता. ऑगस्ट २०२० च्या तुलनेत ऑगस्ट २०२१ मध्ये विक्रीत ५१ टक्के वाढ झाली आहे.
सरकारने गेल्या आठवड्यात वाहन, वाहन घटक उद्योगासाठी PLI योजना मंजूर केली, यासाठी सरकारने २६,०५८ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे ७.६ लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळतील. विद्यमान ऑटो कंपनी व्यतिरिक्त या योजनेचा लाभ त्या कंपन्यांना देखील उपलब्ध होईल, जे ऑटोमोबाईल किंवा ऑटो घटक उत्पादन व्यवसायात नाहीत.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *