Breaking News

टाटा-मिस्त्री वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता, हे आहे कारण डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभे करण्याची योजना

मुंबईः प्रतिनिधी
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यामधील वाद आता पुन्हा एकदा वाढू शकतो. वास्तविक शापूरजी पालनजी समूहाचे प्रवर्तक गुंतवणूकदारांना डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. यासाठी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. या संदर्भात मिस्त्री कुटुंबीयांच्या कंपनीने २५ सप्टेंबर रोजी कंपनी रजिस्ट्रारकडे कागदपत्रे सादर केली आहेत.
टाटा सन्सने मिस्त्रींच्या अशाच हालचालींवर आधीच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात वाद वाढण्याची शक्यता कायदेशीर तज्ञ वर्तवत आहेत. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा १८ टक्के हिस्सा आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर २०१६ मध्ये टाटा आणि मिस्त्री यांच्यात वाद सुरू झाला.
मिस्त्री कुटुंबाने स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ६,६०० कोटी रुपये प्रमोटर ग्रुप कंपनी इव्हेंजेलोस व्हेंचर्सच्या माध्यमातून उभारले जातील. यासाठी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटचे प्रवर्तक, ज्यात टाटा सन्समध्ये ९.१८५ टक्के हिस्सा आहे, टाटा सन्सचे समभाग समूहाची कंपनी इव्हेंजेलोस व्हेंचर्सद्वारे गहाण ठेवून ६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.
स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटसह स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडे टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेडच्या २,८०० कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी हे तारण ठेवण्यात आले होते. मात्र, कागदपत्रांनुसार कर्जाची परतफेड गेल्या महिन्यात वेळेवर झाली होती आणि बँकेने समभाग जारी केले होते. शापूरजी पालनजी अँड कंपनी आणि टाटा सन्सने त्यांना या संदर्भात पाठवलेल्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद दिला नाही.
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी २०१२ मध्ये स्वीकारली होती. परंतु त्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये मिस्त्री यांची या पदावरू हकालपट्टी करम्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून आणि समूहातील अन्य पदांवरूनही काढण्यात आलं होतं. या निर्णयाविरोधात मिस्त्री यांनी २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी न्यायाधीकरणाकडे दावा दाखल केला होता.
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्षपद पुन्हा देण्यात यावे असा निर्णय न्यायाधिकरणानं दिला होता. तसंच त्यांच्या जागी एन.चंद्रशेखर यांची करण्यात आलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवण्यात आली होती. त्यानंतर टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. न्यायालयाने सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी योग्य असल्याचे म्हटले होते.

Check Also

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *