Breaking News

Tag Archives: winter session at mumbai

विधिमंडळाचे पुढील अधिवेशन नागपुरात? अजित पवारांनी दिले हे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर पवारांचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन गेली २ वर्षे नागपुरात झाले नाही. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यापूर्वीही मागील आठवड्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे पण बडतर्फीची नाही विलिनीकरणाबाबत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार- परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील एसटी संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. मात्र बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नसल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली. संपकरी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या …

Read More »

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी सांगितले की… विधानसभा अध्यक्ष निवडणूकप्रश्नी मविआच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मराठी ई-बातम्या टीम मागील ८ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदाकरीता सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवशेनातच निवडणूक घेण्याच्या हालचाली महाविकास आघाडीने सुरु केल्या. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत सदर निवडणूकीच्या अनुषंगाने माहिती …

Read More »

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागूः जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध …

Read More »

नाव जाहीर नाही मात्र शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड काँग्रेसकडून सध्या दोन नावांची चर्चा

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाचे पद काँग्रेसला देत त्यावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मागील आठ महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र या पदासाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव …

Read More »

अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाका संपामुळे सर्वाचेंच हाल- पहिल्यांदाच केले आवाहन

मराठी ई-बातम्या टीम मागील दिड महिन्याहून अधिक काळ राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यादाच मत मांडत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो विलिनीकरणाचे डोक्यातून काढून टाका असे आवाहन त्यांनी विधानसभेत करत एकप्रकारे विलिनीकरण शक्य नसल्याचे ध्वनित केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत अजित पवार बोलत होते. …

Read More »

आणि फडणवीसांच्या आक्षेपानंतर शिवसेनेने मागे घेतली हरकत सुनिल प्रभू यांनी हरकत मागे घेत असल्याचे जाहीर करत माहितीचा मुद्दा केला पुढे

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना पाहुन विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदाराने म्यॉव म्यॉव असा उच्चार करत चिडविण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा संदर्भ धरत शिवसेनेचे गटनेते सुनिल प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आमदारांच्या वर्तनाबाबत निर्बंध असावेत आणि त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना …

Read More »

अखेर सेना नेत्यांच्या पळापळीनंतर रामदास कदमांना विधान भवनात प्रवेश अण्टीजेन टेस्टनंतर मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दिला कदम यांना प्रवेश

मराठी ई-बातम्या टीम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवसेना आमदार रामदास कदम यांनी नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजवून दिली. मात्र हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आलेलेल्या रामदास कदम यांना त्यांच्याकडे चाचणी अहवाल नसल्याने सुरक्षा रक्षकांनी अडवित विधान भवनात प्रवेश देण्यास नकार …

Read More »

अजित पवार म्हणाले, सरकार पळ काढणारं नाही आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच

मराठी ई-बातम्या टीम महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज दिली. कोरोनामुळे राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याचे एक ते …

Read More »

आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर

मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …

Read More »