Breaking News

Tag Archives: weather

पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १०हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या …

Read More »

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुंबईतील रस्ते १००० टँकर्सच्या पाण्याने धुणार

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ …

Read More »

थंडीचा कडाका वाढणार.. बर्फवृष्टी आणि पश्चिमी चक्रवाताचा परिणाम

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी अवतरली आहे. हिमालयीन विभागात पुन्हा बर्फवष्टी होणार असल्याने संक्रांतीपर्यंत रात्रीच्या किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट कायम असल्याने या भागात थंडीचा कडाका …

Read More »

“या” जिल्ह्यांना पुढील ४ ते ५ दिवस रेड आणि यलो अलर्ट मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने चांगलीच हजेरी लावत सातत्याने पाऊस कोसळत आहे. परंतु मागील दोन दिवस पावसाने उघडीप दिली असे वाटत असतानाच आगामी ४ ते ५ दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत …

Read More »

हवामानात कोणताही बदल नाही पण “या” ठिकाणी मान्सूनची हजेरी हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात फक्त ढग जमा झाले आहेत. पण अद्याप मराठवाड्यात मान्सून …

Read More »

उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त …

Read More »

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक घटकाने वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. ‘क्लायमेट चेंज 2.0 – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावरील …

Read More »

मुंबईत हुडहुडी, नाशिक आणि जळगावात थंडीची लाट १० ते १५ अंश सेल्सियस खालीपर्यंत तापमान घसरले

मुंबईः विशेष प्रतिनिधी सततच्या अवकाळी पावसामुळे आणि पर्यावरणातील बदलामुळे यंदा थंडीचा भलताच गारठा मुंबईकरांना जाणवायला लागला आहे. दिवस उजडून माथ्यावर आलातरी वाजणारी थंडी कमी होत नसल्याने मुंबईकरांनी दिवसाही स्वेटर, जॅकेट घालण्यास सुरूवात केल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यातच १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक, जळगांव मध्ये थंडीची लाट येणार असल्याचे …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान ! २४ ते २६ जानेवारीला वादळी पाऊस पडणार

शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि …

Read More »