Breaking News

Tag Archives: tribal community

उद्योगमंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती,… भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी देणार

गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करत आहेत, राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी (इन्सेन्टिव्ह) दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमीपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, जिल्हा औद्योगिक …

Read More »

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात केली ‘इतक्या’ कोटींची भरीव तरतूद १२ हजार ६५५ कोटी रूपयांची विविध योजनांसाठी

अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी १२ हजार ६५५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी एक लाख घरे बांधली जाणार असून, त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहे. यामध्ये …

Read More »

आदीवासीबहुल जिल्ह्यातून हि १७ पदे स्थानिक आदीवासींमधून भरण्याचा निर्णय आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे आदिवासी युवक – युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीत राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे निर्देश, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरा

अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्या बाबतचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तात्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. …

Read More »

पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच राणा दांम्पत्याचा सवाल अजित पवार तेव्हा झोपले होते का?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील जागे करीता एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत रवि राणा यांना पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावरच नवनीत कौर या दोन वेळा अमरावतीतून खासदार म्हणून निवडूण आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील मेळघाट, धारणी या आदीवासी बहुल भागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज !: नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी …

Read More »

आत्ताच्या सत्ताधिकाऱ्यांनी देश विकायला काढला मविआ सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध : नाना पटोले

साकोली: प्रतिनिधी देशात काँग्रेसने प्रदीर्घकाळ लोकशाही टिकवून  ठेवली आहे परंतु २०१४ पासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. संविधानाच्या आधारावर काँग्रेसने सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला. मात्र आत्ताच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढला आहे. देशातील सध्याची परिस्थिती …

Read More »

आता आदीवासींना वनहक्क प्रश्नी विभागीयस्तरावर दाद मागता येणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जंगल वननिवासी संदर्भात वैयक्तीक किंवा सामुहिकस्तरावरील प्रकरणी जिल्हास्तरावरील प्रशासनाने दिलेल्या निकालाच्या विरोधात विभागीयस्तरावर दाद मागता येत नव्हती. तसेच यासंदर्भात कायद्यात तरतूदही नव्हती. मात्र आता त्यांना जिल्हास्तरावरील समितीने दिलेल्या निकालाच्या विरोधात विभागीयस्तरावर दाद मागता येणार आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश काढत आदीवासींना दाद …

Read More »

रोप वाटप करून मुरबाडमधील युवक-युवती करणार सत्यशोधक पध्दतीने विवाह लग्नाच्या मांडवातच पतीच्या साक्षीने पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेल्या जातीअंताच्या चळवळीचा वारसा पुढे चालवित मुरबाडच्या एका युवकाने सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत लग्न समारंभात नियोजित वधूचे पुस्तक प्रकाशित करण्याचा आणि उपस्थितांना पर्यावरण संवर्धानासाठी रोप वाटप करून समाजासमोर एक …

Read More »