Breaking News

Tag Archives: teacher

दीपक केसरकर यांचे आश्वासन, शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

घोषित शाळांतील शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या १५ नोव्हेंबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांनी सुरू असलेले आंदोलन थांबवावे, असे आवाहन …

Read More »

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयासह आमदार बंब यांच्या विरोधात शिक्षकांचे आंदोलन वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक भारतीची मागणी

आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. त्यानुसार आज राज्यभर बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. तसेच शिक्षक भारतीच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने …

Read More »

माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे …

Read More »

शिक्षक पदभरतीसाठी स्वप्रमाण पत्र अद्ययावत करण्यासाठी मुदत वाढविली १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी ०२ सप्टेंबर २०२१ रोजी ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत ३९०२ पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या अशा सुमारे १९६ व्यवस्थापनांतील सुमारे ७६९ रिक्त पदांसाठी …

Read More »

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत …

Read More »

आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात येण्यास राज्य सरकारने जनतेला मनाई केली. त्यामुळे एका शिक्षकाने आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रवेश न मिळाल्याने अखेर त्याने आकाशवाणी आमदार निवासाच्या ४ थ्या मजल्यावर सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु …

Read More »

शिक्षकांना दिलासा: कोविड कामातून मुक्त तर सरप्लस शिक्षकांना शाळेत बोलविणार शालेय शिक्षण विभागांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड प्रसार रोखण्यासाठीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्या कामातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत सरप्लस अर्थात अतिरिक्त शिक्षकाना त्यांच्या जवळच्या किंवा मूळ शाळांमध्ये बोलावून ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचा उपयोग करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने आज राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती …

Read More »

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम जाहीर विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जूनला मतदान

मुंबई : प्रतिनिधी मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. याआधी आठ जूनला यासाठी मतदान होणार होते. परंतु, कपिल पाटील आणि निरंजन डावखरे …

Read More »