Breaking News

Tag Archives: sugar factories

देवेंद्र फडणवीस यांनी मानले ऊसाच्या एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी पंतप्रधानांचे आभार ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल तर ३.६८ लाख हजार कोटींची युरिया सबसिडी ३ वर्षांसाठी

केंद्र सरकारने युरियावर ३ वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा मी नितांत आभारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले अन्य महत्वाचे निर्णयः महिला, जात प्रमाणपत्र, साखर कारखाना… आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवत सर्वांना खुश करण्याचे निर्णय

एकाबाजूला अस्थिर राजकिय वातावरण आणि दुसऱ्याबाजूला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या पार्श्वभूमीवर सर्व वर्गातील नागरीकांना खुष करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यास सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्या पक्षातील सहकार (स्वंयघोषित) महर्षींना कायद्याने एकाबाजूला सहकारी संस्थांच्या थकबाकी प्रकरणातून पळवाट काढून देत असतानाच दुसऱ्याबाजूला अडचणीत असलेल्या …

Read More »

शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे

भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …

Read More »

साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ९ जानेवारी २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले, अरे मी सातवेळा बारामतीतून का निवडूण आलो? कारण… आमदारांना पाडा आणि विकास काम करा

एका कार्यकर्त्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिट्ठी देत वाचून घ्या म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. या चिट्ठीत म्हटलं होतं की, बारामती, माढ्यात ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा विकास करा. हे वाचल्यानंतर अजित पवारांनी भरसभेत या कार्यकर्त्याला ‘आमदार पाडा आणि विकास करा’, असा खोचक टोला लगावला. ते शनिवारी …

Read More »

साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला जगात तिसरा

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल …

Read More »

इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा …

Read More »

शिल्लक ऊसाचा प्रश्न निकालीः संपेपर्यंत होणार गाळप; अनुदानही मिळणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत देत १ मे नंतर गाळप …

Read More »

अजित पवारांचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाविकास आघाडीच काही ठिकाणी जिल्हा पातळीवर निर्णय पण मैत्रीपूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार …

Read More »

अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रातील या ३० साखर कारखान्यांवर येणार संक्रात? जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर …

Read More »