Breaking News

Tag Archives: st bus

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …

Read More »

आता एसटीही आली रेल्वेच्या आयआरसीटीवर एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य …

Read More »

राज्य सरकारने एसटीला दिले ऑक्टोबरच्या वेतनासाठी २०० कोटी राज्य सरकारने ३६० कोटी द्यावेत, कर्मचारी संघटनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन थकले असून शुक्रवारी राज्य सरकारने महामंडळाला २०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही रक्कम अपुरी असून दरमहा वेतनासाठी ३६० कोटी रुपये द्यायला हवेत, असे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाने मागील थकबाकी आणि ऑक्टोबरच्या वेतनासाठी सरकारकडे ७९० कोटी रुपयांची मागणी केली …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय  डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून …

Read More »

आशियाई बँकेने सांगितले मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पांना अर्थसहाय्य सुरु

सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमीः सरसकट ५ हजाराची दिवाळी भेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ …

Read More »

दिवाळीच्या तोंडावर लालपरीच्या भाड्यात वाढ २१ ते ३१ ऑक्टोबर, दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ

दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २०.१०.२०२२ व २१.१०.२०२२ रोजीच्या मध्यरात्री ००:०० नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. …

Read More »

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस

दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी ST ने १.५० लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना एसटीच्या ३ हजार ४०० गाड्यांचे आरक्षण फुल; १९०० गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत. गणेशोत्सवासाठी ST अर्थात एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य …

Read More »

एसटीने प्रवास करताय, अन् सुटे पैसे नाहीत, काळजी करू नका आता अडचण दूर युपीआय, क्युआर कोड, डेबिट/क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध

एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार …

Read More »