Breaking News

Tag Archives: skill development

कोरोना संकटकाळात ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार कौशल्य विकास व रोजगार मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक …

Read More »

कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …

Read More »

अनुकंपा तत्वावरील त्या ५६९ तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर वायरमन (तारतंत्री) पदाच्या नोकरीसाठी पात्र असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहीलेल्या तरुणांना राज्यातील आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यंदा विद्युत वितरण कंपनी आणि आयटीआय यांच्यामार्फत राज्यातील पात्र ५६९ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात …

Read More »

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनों या संकेतस्थळावर नावे नोंदवा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर …

Read More »

मुंबईत १७ हजार जागांसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन मेळावे एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार जागापैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …

Read More »

रोजगारविषयक मार्गदर्शन आणि ऑनलाईन कौन्सिलिंग आता प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान प्रायोगिक तत्वावर २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात …

Read More »

कौशल्य विभागाच्या त्या संकेतस्थळामुळे हजाराहून अधिकांना मिळाला रोजगार २५ हजार ४७ उमेदवार आणि ११५ उद्योगांचा सहभाग, ऑनलाईन रोजगार मेळावे- मलिक

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या मोहिमेंतर्गत राज्यात …

Read More »

खाजगी-सरकारी नोकरी पाहिजे, कामगार पाहिजे या संकेतस्थळावर नाव नोंदवा एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती: कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल …

Read More »

राज्याच्या कौशल्य विकासचे विद्यार्थीही उतरले कोविडच्या युध्दात १५० उमेदवारांना हॉस्पीटलमध्ये मिळाली अप्रेंन्टीसशिप

मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात नर्स, डॉक्टरांचा स्टाफ कमी पडत असल्याने कोरोना यौध्द्यांची भरती राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र तरीही संख्या कमी पडत असल्याने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून नर्सिंग, लॅब टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशिअन आणि पॅरा मेडिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई. ठाणे येथील रूग्णालयात अप्रेंटीशिप देण्यात येत …

Read More »

कौशल्य विकासच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी नोकरीच्या संधी मंत्री नवाब मलिक यांचे विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित करून राज्याबरोबरच परदेशातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार करण्यात येणार असून याच कंपन्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब …

Read More »