Breaking News

Tag Archives: shivsena

भुसे-केसरकरांचा खळबळजनक आरोप: नक्षलवाद्यांच्या धमक्या असूनही शिंदेंना सुरक्षा नाकारली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी तेथील नक्षलवाद्यांनी शिंदे यांना मारण्याचा कट आखला. तसेच धमक्याही दिल्या. याची माहिती असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली. तसेच त्यांना सुरक्षेची गरज नाही असे उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्या रक्तातच शिवसेना नव्हती…कपाळी गद्दारीचा शिक्का बंडखोरांवर आदित्य ठाकरे यांनी केली टीका

आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांशी …

Read More »

विनायक राऊत यांचा आरोप, त्यांचे पत्र येण्याआधीच लोकसभा सचिवांकडून शेवाळेंची नियुक्ती लोकसभा सचिवांकडून आमच्यावर अन्याय नैसर्गिक न्याय नाकारला

दोन दिवसांपूर्वी आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी लोकसभेतील गटनेते आणि पक्षप्रतोद बदलण्यात आल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून दिले. मात्र शिंदे गटाकडून हे पत्र देण्याआधीच लोकसभा सचिवांकडून दोन दिवस आधीच जारी करण्यात आलेल्या पत्रात राहुल शेवाळे यांची गटनेते पदी निवड करण्यात …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप

महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …

Read More »

संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने बजावले नवे समन्स २७ तारखेला चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर २० तारखेला ईडी चौकशीसाठी येता नसल्याचे कारण देत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ७ ऑगस्ट नंतरची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र ईडीने संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने त्यांना सुधारीत तारीख दिली मात्र ७ ऑगस्टनंतरची तारीख देण्याऐवजी त्यांना याच महिन्यातील २७ …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले,…या सारखे समाधान नाही ओबीसी आरक्षणप्रकरणी केलेल्या कामाबाबत व्यक्त केले समाधान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने गदा आणली. त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून त्यावेळी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवित राज्य भरात आंदोलनाचा सपाटाच लावला. तसेच ओबीसी आरक्षणावरून अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर राज्यातील ओबीसींना न्याय देत काढून घेतलेले …

Read More »

ठाकरे-शिंदे वादावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, काही कायदेशीर प्रश्न स्पष्ट होणे गरजेचे… पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार; २७ जुलै पर्यत दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेची याचिकेसह अन्य सहा याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश रमण यांनी या सर्व याचिकांमधून काही घटनात्मक प्रश्न निर्माण …

Read More »

संजय राऊत ट्विट करत म्हणाले, पीठ से निकले खंजरों को गिना जब… बंडखोर खासदारांवर टीका करत फुटीरावर शायरीतून निशाणा

राज्यात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते माझे सहकारी होते. त्यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, सकाळचा मॅटनी शो बंद झाला, त्याची दखल… संजय राऊतांवरील प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित पक्षातील ५० आमदारांना सोबत घेवून राज्यात भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदारांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर आले. आज दुपारी १२ खासदारांना आपल्या गटात सहभागी करून घेतल्यानंतर त्या १२ खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे हे …

Read More »

राष्ट्रवादीने दिले रामदास कदम यांना प्रत्युत्तर, विश्वासघात योग्य असल्याचे… शिवसेना फोडली... ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न रामदास कदम व बंडखोर नेत्यांचा आहे - महेश तपासे

बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. २०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी – शिवसेना …

Read More »