Breaking News

Tag Archives: sharad pawar

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चेहऱ्याचे नंतर पाहू आधी एकत्रित येणे महत्वाचे.. राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले...

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सध्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, तसेच आघाडीचा चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव …

Read More »

शरद पवार म्हणाले, भाजपात आदेश देण्याची संस्कृती; बिच्चारे शिंदे कर्नाटक निवडणूकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर गेले त्यावर शरद पवारांची उपरोधिक टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी १० मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांनीही प्रचार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सोमवारी ८ मे कर्नाटकात प्रचाराला गेले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो, …

Read More »

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार ११ मे रोजी पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय नेते नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेतील, अशी माहिती जद(यू.) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली. नीतीश कुमार यांच्या सोबत बिहार विधान …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, त्यांची कॅटेगरी कोणती? , तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते मोठे नेते ते बोलले… काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रंगला कलगीतुरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यावरून खुद्द शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आज …

Read More »

आणि सुषमा अंधारे यांनी शरद पवारांच्या मदतीचा किस्सा सांगत भर कार्यक्रमातच रडल्या शरद पवारांनी एक फोन केला आणि पाच तासात मी दिल्लीत त्यांच्यासमोर हजर होते

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुरोगामी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. परंतु बंडखोरीवरून शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री यांना आपल्या वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी चांगलेच घायकुतीला आणले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून अश्वाघ्य पध्दतीने सुषमा अंधारे यांच्यावर …

Read More »

शरद पवार यांची टीका, मणिपूर सारखे राज्य सांभाळता येत नाही अन कर्नाटकात… कर्नाटकमधील ४० टक्क्याचे धोरण देशात राबविण्याचा काही जणांचा विचार

कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून इथल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे, परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे …

Read More »

पवारांपाठोपाठ आता नाना पटोले यांची स्पष्टोक्ती,… जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा …

Read More »

अन्, छगन भुजबळ यांनी आठवण करून दिली राज ठाकरेंना पुण्यातील ‘त्या’ मुलाखतीची पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी ६ मे रोजी रत्नागिरीत सभा पार पाडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. शरद पवार यांच्या तोंडून कधीही शिवरायांचं नाव येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपा….? शरद पवार यांनी केले निकालाचे भाकित काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात थळ ठोकलेला आहे. त्यातच भाजपाच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या नव्या जबाबदारीबाबत शरद पवार यांचे वक्तव्य, कोणतीही जबाबदारी घेण्यास.. लोकसभा निवडणूक होईपर्यंत जबाबदारी नाही

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांचा राजीनामा स्विकारण्यास विरोध केला. तर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी शरद पवार यांना वैयक्तिक फोनवरून राजीनाम्याचा निर्णय मागे …

Read More »