Breaking News

Tag Archives: school education minister varsha gaikwad

अखेर १० वीचा निकाल उद्या; फेर तपासणी आणि पुर्नपरिक्षेच्याही तारखा जाहिर इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री …

Read More »

शाळांना मिळणार वाढीव अनुदान उपमुख्यमंत्र्यांची मान्यता-मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

१३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान व ज्या शाळा २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही शाळांच्या त्रुटींमुळे अनुदान सुरू करता आले नव्हते. …

Read More »

शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ

शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, …

Read More »

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन

मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …

Read More »

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार शाळांसाठी आता पाच टक्के निधी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाकरीता नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीस उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक सुविधा देणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही सर्व फंडातून निधी उपलब्ध करून देणार-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ग्वाही

मागील काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच या घटना प्रामुख्याने शाळेच्या आवारातच घ़डत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टी कोणातून सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. विधानसभेत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दा काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान …

Read More »

शिक्षण मंत्री गायकवाडांचा मोठा निर्णयः तर शाळेची मान्यता रद्द आणि केंद्रही काढून घेणार विधान परिषदेत केली घोषणा

मागील काही महिन्यापासून पेपर फुटीप्रकणावरून सर्वच परिक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर यास आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत मोठी घोषणा केली असून एखादे शाळेत पेपर फुटीची घटना घडल्यास त्यासाठी शाळा व्यवस्थापनास जबाबदार धरून शाळेची मान्यताच रद्द करण्यात येणार आणि जर कॉपी प्रकरण आढळून आले तर त्या …

Read More »

आता १२ वीच्या वेळापत्रकात बदल: दोन विषयांचे पेपर मार्चऐवजी एप्रिल महिन्यात इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ०५ मार्च आणि ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे ०५ एप्रिल आणि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री …

Read More »

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मिळणार सवलतीचे गुण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मागील दोन वर्षांपासून कोविड कारणामुळे एकाही विद्यार्थाला क्रिडा स्पर्धेत किंवा खेळाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे क्रिडा गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गतवर्षी लेखी परिक्षा घेण्याऐवजी मुल्यांकन करत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा …

Read More »

मंत्री वर्षा गायकवाडांनी सांगितले की, १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सुविधा दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा

मराठी ई-बातम्या टीम   कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९६१३ …

Read More »