Breaking News

Tag Archives: scholarship

राज्यातील १० विद्यार्थिनींना न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कॉलेजची शिष्यवृत्ती

न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. या शिष्यवृत्तीमुळे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रूपाने राज्यातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची …

Read More »

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते, मात्र नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी, ..सर्व विद्यार्थ्यांना महाज्योती तर्फे फेलोशिप द्या

महाज्योती संस्थेतर्फे संशोधन करण्यासाठी ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप मागील वर्षांच्या निकषात बसणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली. गेल्या ३२ दिवसांपासून राज्यातील विविध भागातील ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थी हे सर्व पात्र …

Read More »

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती …

Read More »

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या …

Read More »

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना तीन महिन्यात वाढीव विद्यावेतन देणार पाचशे रूपये विद्यावेतन देणार असल्याची मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर …

Read More »

मुनगंटीवार यांची घोषणा, जैवविविधतेत संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना शिष्यवृत्ती देणार

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या तीन वर्षात शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार …

Read More »

५ वी आणि ८ वीची ‘ही’ परिक्षा पुढे ढकलली; अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा शिक्षण विभागाची माहिती; अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २० जुलै २०२२ ऐवजी आता रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच …

Read More »

पदवी- पदव्युत्तरची वेगळी शाखा असली तरी एससीच्या विद्यार्थ्यांना परदेशी स्कॉलरशीप परदेशी शिष्यवृत्तीस पात्र - मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता. आता हा अडसर दूर केला आहे. आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल आणि त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी …

Read More »