Breaking News

Tag Archives: remdesivir

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडिसिवर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. …

Read More »

केंद्र मोफत लस देणार म्हणणाऱ्यांनी माहिती तपासून घ्या; १८ ते ४४ ची जबाबदारी राज्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विरोधकांना टोला लगावत ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र काहीजण केंद्र सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याची चुकिची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती तपासून घ्यावी असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावत १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्राचे केंद्राच्या एक पाऊल पुढे लस आणि रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना भाजपाशासित आणि बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रातील मोदी सरकारकडून दुजाभाव करण्यात येत माहिती पुढे येत असतानाच आता राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्राच्या मदतीवर विसंबून न राहता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून लस आणि रेमडेसिवीरची खरेदी करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी …

Read More »

ऑक्सीजन, रेमडेसिवीर अभावी जीव जात असतानाही भाजपाचे राजकारण भाजपा शासीत राज्यातील कोरोना स्थितीवर हायकोर्टाने ओढलेले ताशेरे डॉ. हर्षवर्धन यांनी आधी पहावेत- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सीजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन …

Read More »

खुषखबर: कोरोनावरील रेमडेसिवीर औषध आता भारतातही तयार होणार सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना परवानगी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांग्ला देशातून १० हजार औषधांचे डोस मागविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता कोरोनावरील रेमडेसिवीर हे औषध भारतात तयार करण्यास देशाच्या औषधी नियंत्रण विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे …

Read More »