Breaking News

Tag Archives: ratan tata will repay 50% loan of air india and 50 % central government.

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »