Breaking News

Tag Archives: rain

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …

Read More »

राज्यातील पावसाळी परिस्थितीत काय केली उपाय योजना? मंत्री अनिल पाटील यांनी दिली माहिती नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर सर्व यंत्रणा सज्ज

राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर २४ x ७ नियंत्रण कक्ष सुरु आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी…. जलयुक्त शिवार, कृषी सिंचन योजनांचा आढावा बैठकीत दिले आदेश

अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, … नुकसान मोठं पण सरकार शेतकऱ्यांच्या सोबत होळीचे रंग अर्थसंकल्पातून दिसून येतील

राज्यातील कोकण विभागातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारा बरसल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारकडून काय मदत जाहिर करणार अशी विचारणा करण्यात आला त्यावर उत्तर देताना …

Read More »

एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, थांबलेलं चक्र वेगानं फिरू लागलं पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा

शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकास कामांचा धडाका सुरू आहे. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक …

Read More »

“या” जिल्ह्यांना पुढील ४ ते ५ दिवस रेड आणि यलो अलर्ट मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने चांगलीच हजेरी लावत सातत्याने पाऊस कोसळत आहे. परंतु मागील दोन दिवस पावसाने उघडीप दिली असे वाटत असतानाच आगामी ४ ते ५ दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत …

Read More »

ठाणे जिल्ह्यात दुपटीने पाऊस, मुंबईचा पाणीप्रश्न सुटला तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ

मागील दोन आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने चांगलीच हजरी लावली. तसेच या दोन आटवड्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याचे नोंद झाली आहे.  जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात ही सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात …

Read More »

राज्यात पावसामुळे ७६ जणांचा मृत्यू तर ८३८ घरांचे नुकसान तर मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

मुंबईसह कोकणात पावसाला तशी उशीराने सुरुवात झालेली असली तरी १ जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावत कधी संततधार तर कधी अतिवृष्टीमुळे अनेक वेळा स्थानिक पातळीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत राज्यात विविध ठिकाणी १ जून ते आतापर्यत पावसामुळे …

Read More »

मुंबईसह ‘या’ भागात १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ …

Read More »