Breaking News

Tag Archives: radhakrushna vikhe-patil

सुजय पाठोपाठ पिता विखे-पाटील आणि गोरेही कमळ हातात घेणार मोहीते-पाटील पितापुत्रांचा दोन दिवसांच्या अंतराने भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेची राजकिय गणिते डोळ्यासमोर ठेवत लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण भाजपचे कमळ हातात घेत आहेत. यात सुजय विखे-पाटील यांचे पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असून काँग्रेसचे जयकुमार गोरे हेही हातात कमळ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे सुपुत्र …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय …

Read More »

राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली …

Read More »

सुजयच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधील विखे-पाटील गटाचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसची अडेलतट्टू भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसमधील विखे-पाटील गटाने केला. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या संभावित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सुजय यांनी व्यक्त केली होती. मात्र सदरची जागा राष्ट्रवादी …

Read More »

भाजप खुशीत तर काँग्रेस कोमात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे सुपुत्र सुजय यांचा अखेर भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने एकापक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उंडी मारणाऱ्या आयाराम-गयारामांची सुरुवात झालेली आहे. मात्र या यादीत आता काँग्रेसचे विधानसभेतील विरोदी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचे नाव समाविष्ट झाले असून त्यांचा आज मंगळवारी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला. त्यामुळे भाजप जोशात तर काँग्रेस कोमात गेल्याची चर्चा राजकीय …

Read More »

शहिद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट सरकारबरोबरच प्रवरा परिवारही पाठीशी उभारणार असल्याची मांडवगणे कुटुंबियांना ग्वाही

नाशिक : प्रतिनिधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीरवैमानिक शहिद निनाद मांडवगणे यांच्या परिवाराची आज नाशिक येथे सांत्वनपर भेट घेतली. तसेच राज्य सरकारबरोबरच प्रवरा परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही विखे-पाटील यांनी मांडवगणे कुटुंबियांना दिली. शहिद निनाद मांडवगणे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे …

Read More »

इंदू मिल व छत्रपती स्मारकाचे काम इंचभरही पुढे सरकले नाही राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून नुसता घोषणांचा पाऊस पाडण्यात येत असून बिहार निवडणूकीच्या आधी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्यास आता वर्षे लोटली. तीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची असून स्मारकाच्या पुतळ्याच्या उंचीचा वाद अद्यापही संपलेला नाही. या दोन्ही स्मारकाबाबत राज्य सरकार सांगतेय तशी परिस्थिती खरी …

Read More »