Breaking News

Tag Archives: privet hospitals

…तर रूग्णालयांवर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा …

Read More »

कोरोना: नोव्हेंबरपर्यंत सरकारी दरानुसारच खाजगी रूग्णालये बीले आकारणार अन्यथा या मेलवर तक्रार करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याचे …

Read More »

मुख्यमंत्री पुन्हा ‘फायली’वर- खाजगी रुग्णालयाच्या दरनियंत्रण आदेशाला तात्काळ मंजुरी द्या भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत देशात क्रमांक एक वर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना खाजगी रुग्णालयांत माफक दरात उपचार मिळू शकणारा ‘दर नियंत्रण प्रस्ताव’ मुख्यमंत्र्यांकडे मागील ८ दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी ‘फायलीवर’ न राहता या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी केली. मुळात एवढ्या मोठ्या महामारीला सामोरे जात असताना राज्य …

Read More »

मुंबईतल्या कोरोनाबाधितांसाठी ८ हजार खाटा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगांव …

Read More »

मुंबईच्या रूग्णालयातील बेड्सची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्त रूग्णांना वेळेत रूग्णालयात खाट न मिळाल्याने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर लक्षण दिसायला लागल्यानंतर सदर व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करता यावे यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयातील खाटांची अर्थात बेडची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. …

Read More »

एकही रुग्ण तपासणी- उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे …

Read More »