Breaking News

Tag Archives: privet hospital

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय …

Read More »

सर्व खाजगी, सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील खाजगी आणि सरकारी रूग्णालयांमध्ये आगीच्या घटना वारांवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेशही …

Read More »

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

अजित पवार म्हणाले, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे येथील …

Read More »

खाजगी रूग्णालयानों रूग्णांना बेड नाकारताय, BMC वॉच करतेय पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. तर …

Read More »

अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …

Read More »

राज्यातील सर्व शासकिय आणि खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्ष कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी राज्यातील सर्वच शासकिय आणि खाजगी रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, …

Read More »