Breaking News

Tag Archives: power supply

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी तीन महिन्यात १३४० दक्षलक्ष युनिट वीजेचा पुरवठा

उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी करून मागणीनुसार पुरवठा करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. उन्हाळ्यातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, …

Read More »

वीज प्रश्नी आता मुख्यमंत्री ठाकरेंचा पुढाकार, दर आठवड्याला घेणार आढावा राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीघकालीन धोरण निश्चित करा-मुख्यमंत्री

राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज उर्जा विभागाची …

Read More »

मंत्री राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा ; अन्यथा कारवाई विदर्भ- मराठवाड्याच्या आढावा बैठकीत दिला इशारा

नागपूर : प्रतिनिधी वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा  देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. …

Read More »

वीजपुरवठा खंडित झाला? मिस कॉल द्या किंवा ‘एसएमएस’ पाठवा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे महावितरण विभागाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची …

Read More »