Breaking News

Tag Archives: police

शरद पवार यांचा इशारा, …तर याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी …

Read More »

स्थानिकांचा विरोध डावलून अखेर बारसूत रिफायनरी प्रकल्पासाठी माती परिक्षण पोलिसांच्या सौम्य लाठिमारानंतरही स्थानिक विरोधकांचे ठिय्या आंदोलन

२०१४ साली राज्यात आणि केंद्रात भाजपाच्या नेत़ृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोकणातील नाणार येथे रिफानरी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा कऱण्यात आली. मात्र त्यास स्थानिक नागरिकांबरोबरच राजकिय नेत्यांचा विरोध वाढल्याने अखेर नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्दबातल करण्यात आला. त्यानंतर सदरचा प्रकल्प हा राजापूर तालुक्यातील बारसू सोलगावात स्थलांतरीत कऱण्यात आला. मात्र या …

Read More »

जयंत पाटील यांची अखेर ग्वाही, त्या युवकांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी… रॅप सॉंग्सच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दात टिका करणार्‍या युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी

व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्‍या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका …

Read More »

अंबादास दानवेंचा आरोपः आदित्य ठाकरेंवरील हल्याप्रकरणी पोलिसांचा गाफीलपणा पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा तक्रार त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून …

Read More »

आता या सोशल मिडीया साईटवरूनही तक्रार नोंदवा, डायल-११२ मध्ये समावेश व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारी- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने धमकी, १०० कोटी द्या, अन्यथा.. नागपूर पोलिस आणि सायबर सेलकडून वेगाने तपास सुरु

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करत १०० कोटी रूपये द्या अन्यथा घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात …

Read More »

अजित पवार म्हणाले, मी असं सटकवलं सरकारला म्हटले काय चाललंय हे कुणीही किती मोठ्या बापाचा असेल कारवाई झालीच पाहिजे

आपल्या राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अगदी अजित पवारानेही नाही तसाच तो शेवटच्या माणसानेही करू नये. कायदा बिघडवण्याचा कुणी प्रयत्न कुणी केला तर कुणीही किती मोठ्या बापाचा असेल, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका अजित पवार यांनी घेतली. पुण्यातल्या एका कार्यक्रमात …

Read More »

पोलिस दलातील पदांसाठी तुम्ही शाररिक चाचणी परिक्षा दिलीय का? मग ही बातमी वाचाच

पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील …

Read More »

अजित पवार म्हणाले, या सरकारच्या काळात पोलिस आणि मंत्रालय प्रशासनावर दबाव

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलीस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलीस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात …

Read More »

अब्दुल सत्तार ते वाय प्लस सुरक्षेवरून अजित पवार यांनी काढले सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा घडी विस्कटवू नका तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात, लक्षात ठेवत असतात, काहीजण सहज बोललो म्हणत आहेत. तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री …

Read More »