Breaking News

Tag Archives: police recruitment

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, गृह विभागात २३ हजार ६२८ पदांची पोलिस भरती

गृह विभागातील १९७६ पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत २३ हजार ६२८ पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. गृह विभागातील पोलीस शिपाई …

Read More »

पोलीस भरती : मुंबई पोलीस दलात ३,००० पदांची कंत्राटी पदभरती ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

पोलीस भरती

मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी …

Read More »

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा: वेळेत पोहोचा… परिक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन

सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

२० हजारांची भरती, विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव यासह राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे असे १४ निर्णय घेण्यात आले आहेत. यातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, विद्यापीठ कायद्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय आदी निर्णय स्वतंत्र बातम्यांच्या माध्यमातून याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या निर्णयाशिवाय …

Read More »

५ हजारांचे प्रशिक्षण सुरु तर ७ हजाराची प्रक्रिया सुरु तर १० हजाराची पोलिस भरती लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यामध्ये सध्या सन २०१९ मधील ५ हजार २९७ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन २०२० मधील ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या …

Read More »

शासनातील क्लार्कची पदे लोकसेवा आयोगामार्फत तर पोलिस भरतीही लवकरच राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

राज्यातील शासन वर्गातील ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती विधानसभेत दिली माहिती

राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची …

Read More »

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा, ७२३१ पदांसाठी पोलीस शिपाई भरती पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार-गृहविभागाची अधिसूचना जारी

दिलीप वळसे पाटील

शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिलीप …

Read More »

पोलिस भरती होवू इच्छिणाऱ्यांसाठी खुषखबर ! NCC प्रमाणपत्र असल्यास मिळणार गुण क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना आगामी काळात ७ हजार २३१ पदांवर पोलिस शिपाई भरती करणार असल्याचे जाहीर केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातच एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते …

Read More »