Breaking News

Tag Archives: police commissioner

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अर्धवार्षिक गुन्हे परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक गुन्हे परिषदेचे आयोजन मुंबईतील पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे म्हणतात, लाठीमार नाही किरकोळ झटापट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होणार होती. मात्र तत्पूर्वीच आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या आधीच वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठविली. त्यावरून अखेर पिंपरी-चिंचवडचे पोलिस …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, कोणी तरी फडणवीसी करणारा फडतूस माणूस… घरावर काही आलं की एसआयटी अन् मिधे गटाच्या हल्ल्यावर फडणवीसी दाखविण्याच हिम्मत नाही

ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती दोन गटातील किरकोळ भांडण

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. रात्री झालेल्या राड्यानंतर …

Read More »

शरद पवारांना आधी फोनवरून त्रास नंतर जीवे मारण्याची धमकी अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या आधीपासून एका उत्तर भारतातील नारायण सोनी नामक व्यक्तीकडून सिल्व्हर ओकवरील निवासस्थानावरील फोनवरून सातत्याने त्रास दिला जात होता. विशेषतः दिवाळीत तर या व्यक्तीकडून दिवसाला शंबभरवेळा फोन करून त्रास देत अर्वाच्च भाषेचा वापर केला जात होता. त्यानंतर सोनी नामक व्यक्तीकडून शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने …

Read More »

अखेर महिला आयोगाने आव्हाडप्रकरणी मागवला अहवाल

भाजपाच्या महिला कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार महिला रिदा रशीद यांनी मग आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

मुंबईवरील हल्ल्याच्या इशाऱ्यावर पोलिस आयुक्तांची माहिती, त्यानंतर एकास अटक तो नंबर पाकिस्तानातील

पाकिस्तानचा कोड असलेल्या एका व्हॉट्सअॅप नंबरवरून मुंबईवर २६/११ च्या धर्तीवर हल्ले करण्यात येणार असल्याचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना आले. त्यामुळे तातडीने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेत, आम्ही काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र ही पत्रकार परिषद संपत नाही तोच मुंबई पोलिसांनी तातडीने …

Read More »

भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …

Read More »