Breaking News

Tag Archives: pmay

गृहनिर्माण मंत्र्यांकडून फडणवीसांचे कौतुक आणि कारभारावर टीकाही भाजपा आमदारांच्या प्रश्नांवर आव्हांडाचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या प्रश्नावर विधानसभेतील चर्चेदरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आणि पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगत त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आणि विकासकांशी असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. …

Read More »

पंतप्रधान ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करावा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण ग्रामीण योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. गृहनिर्माण दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी …

Read More »

आता प्रत्येकाला एकच घर उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्य सरकारचे धोरण

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये शासकिय योजनेच्या माध्यमातून नागरीकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र अनेक ठिकाणी विशेषतः मुंबईसारख्या शहरात एकापेक्षा अनेक घरे शासकिय योजनेतून मिळविण्याचे प्रकार वाढीस लागेल आहेत. या अशा एकापेक्षा अधिक घर लाभार्थ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यापुढे भविष्यात शासकिय योजनेतून …

Read More »

मेट्रो भवन आणि प्रधानमंत्री आवास योजना टेंडर घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आरे कॉलनी येथे एमएमारडीए मार्फत होणा-या मेट्रो भवन व सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने मार्फत ८९ हजार घरे बांधण्याच्या टेंडरमधील महाघोटाळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्याच्या कागदपत्रांसहित आज सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकृत तक्रार केली. या टेंडर घोटाळ्यामध्ये विशिष्ट …

Read More »

खासगी जमिनीवरील अतिक्रमणधारकही होणार घराचे मालक जमिन पट्टेवाटपासाठीच्या कार्यप्रणालीस राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबईः प्रतिनिधी सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची शीघ्रतेने अंमलबजावणी करण्यासाठी खासगी जमिनीवरील अत‍िक्रमणधारकांनाही आता त्याच जमिनीची मालकी मिळणार आहे. तसेच अतिक्रमणधारकांना सर्वांसाठी घरे या योजनेतून घरेही मिळणार असून त्यासाठी जमिनीचे पट्टेवाटप करण्यासाठी कार्यप्रणाली निश्च‍ित करण्यात आली असून त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागरी स्थान‍िक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात …

Read More »

कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे १ हेक्टर पर्यंत नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे ते पीककर्ज माफ करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जच घेतले नाही त्यांना शासकिय मदतीप्रमाणे तीन पट नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पूरग्रस्त भागात करण्यात येत असलेल्या कामाचा आढवा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक …

Read More »

बेघरांसाठी घर बांधणाऱ्या सरकारी संस्थेलाच कार्यालयासाठी जागा मिळेना

सिडकोकडून मात्र जागेसाठी सवलतीच्या दरात १७ लाख भाडे मुंबईः प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक नागरीकाला हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ अर्थात महाहौसिंग या स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली. या महाहौसिंगला सवलतीच्या दरात जागा देण्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. मात्र त्यांच्या आदेशाला चक्क सिडकोने केराची टोपली …

Read More »

निवडणूक आश्वासन: पीएमएवायच्या लाभार्थ्यांना मिळणार ३.५० लाखाचे अनुदान

मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनाच मिळणार अनुदान मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूका येण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच  पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायतंर्गत घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ३.५० लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राने नुकतेच राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती नगरविकास विभागातील विश्वसनीय …

Read More »

सर्वांसाठी घरांच्या निर्माणाची जबाबदारी आता म्हाडा ऐवजी स्वतंत्र मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य पिछाडीवर राहील्याने केंद्र सरकारकडून कानपिचक्या मिळाल्या. त्यामुळे शहाणे झालेल्या फडणवीस सरकारने राज्यात पंतप्रधान गृहनिर्माण योजना प्रभावी राबविण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे अर्थात …

Read More »

‘सर्वांसाठी घरे’ योजना कंत्राटी अभियंत्याच्या हातात पंतप्रधान आवास योजनेसाठी १६०० कंत्राटी अंभियंते घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वसामान्य नागरीकांना आणि प्रत्येकाला घर देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे अर्थात पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली. मात्र सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पुरेसे अभियंते नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारकडून १६०० कंत्राटी अभियंते नियुक्त …

Read More »