Breaking News

Tag Archives: online auto booking

१ जानेवारीपासून होणार ‘हे’ ६ बदल, जाणून घ्या… मुलांचे लसीकरण, एटीएममधून पैसे काढणे, कपडे-पादत्राणे खरेदी, ऑनलाईन बुकिंग यासह ६ गोष्टीं महागणार

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष म्हणजे २०२२ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे आणि कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. १ जानेवारीपासून होणार्‍या ६ बदलांबद्दल आपण जाणून घेऊया. 1. ATM मधून पैसे काढणे महागणार आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. 2. कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होईल  कपडे आणि पादत्राणांवर १ जानेवारीपासून १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST ७ टक्क्याने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. 3. मुलांना कोरोनाची लस देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वी वर्ग ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. 4. पोस्ट पेमेंट बँकेने वाढवले शुल्क इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून रोख रक्कम काढणे आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५० टक्के शुल्क भरावे लागेल जे किमान २५ रुपये असेल. मात्र, बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा २५,००० रुपयांपर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.२५ टक्के शुल्क आकारले जाईल. 5. अॅमेझॉन प्राइमवर क्रिकेट सामने Amazon च्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट स्ट्रीमिंग खेळात प्रवेश करत आहे. 6. कार महागार नवीन वर्षात तुम्हाला मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्के वाढवणार आहे. Share on: WhatsApp

Read More »