Breaking News

Tag Archives: minister balasaheb patil

अजित पवार यांची घोषणा, शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे १ जुलै या कृषीदिनापासून वाटप

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषी दिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच …

Read More »

अजित पवारांचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाविकास आघाडीच काही ठिकाणी जिल्हा पातळीवर निर्णय पण मैत्रीपूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार …

Read More »

अजित पवार म्हणाले, चार-चार चौकशा झाल्यापण हाती काहीच नाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही माहिती देणार

राज्यातील सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आतापर्यंत चार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातील दोन चौकश्या या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात तर दोन चौकशा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना झाल्या. मात्र या चौकशांमधून हाती आलेले नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बँकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या …

Read More »

छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांना आकारलेले ते सर्व शुल्क परत करा लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या-भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम २५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या ५० हजार छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाची बाब आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लक्षात आणून देत या अन्यायकारक निर्णयाला स्थगिती द्या, अशी आग्रही मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्राव्दारे केली आहे. सहकार विभागाने महाराष्ट्र …

Read More »