राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री …
Read More »शंभूराज देसाई यांची माहिती, अग्निवीरांच्या पुनर्वसनाबाबत शासनाकडे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय अग्निवारांच्या पुर्नवसनाबाबत धोरणच तयार नाही
अग्निवीर योजनेतंर्गत सेवा पूर्ण करून परतणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल ७ एप्रिलपूर्वी शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी अग्निवीर जवानांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई …
Read More »उदय सामंत यांची माहिती, मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील पथविक्रेत्यांना तात्पुरती जागा देणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन
मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी …
Read More »वरळीतील टेस्टिंग लॅबच्या भूखंडावर बहुमजली रोबोटिक पार्किंग प्रकल्प आणि इमारतीच्या टेंडरची चौकशी सपा आमदार रईस शेख याच्या प्रश्नाला माधुरी मिसाळ यांचे उत्तर तर नार्वेकर यांचे बैठकीचे आश्वासन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील महापालिकेच्या टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड कार्यालय बांधकाम रेंगाळत ठेवल्याबाबत नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्न …
Read More »शंभूराज देसाई यांचे आश्वासन, मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती
मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील …
Read More »महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी महोत्सव उत्साहात संपन्न! शेतीच्या कामात महिला भगिनी अग्रेसर ; शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांच्या वाणांमुळेच! : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे काम चांगले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे काम हे दीपस्तंभासारखे आहे. अजूनही आपल्याला खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. शेतीच्या कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषी विभागांतर्गत आपण …
Read More »मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा? मनिषा फडतरे यांच्या विजयावर आक्षेप घेत पुर्न मतमोजणी घेण्यात आली त्यानंतर भारती गोरे विजयी
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे …
Read More »नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा घेतला आढावा
राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »१५० दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्य शासनाने १५० दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये ३ हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात २०० गुणांपैकी १८५ गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे. कार्यालयीन मूल्यमापनात १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील ६८ सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालय आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आणि काही भाडेत्त्वावरील जागेत आहेत. या सर्व कार्यालयांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी चेंबूर येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला अधिक गती देऊन पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya