Breaking News

Tag Archives: merc

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका, एकही झाड तोडायचे नाही महाविकास आघाडीच्या निर्णय बदलानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईचे पर्यावरण राखण्याच्या उद्देशाने आणि भविष्यकाळातील मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडी सरकारला घालवून टाकत राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मविआ सरकारचा तो निर्णय रद्दबादल करत पुन्हा आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला. मात्र या विरोधात पर्यावरण प्रेमींनी …

Read More »

ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई आघाडी सरकारला जाब विचारण्याचे- भाजपाचे वीज नियामक आयोगाला आवाहन

सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे सामान्य वीजग्राहकावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने टंचाई निर्माण …

Read More »

राज्यावर भारनियमनाचे सावटः पण टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट

विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी …

Read More »

अदानीच्या मनमानीला राज्य वीज नियामक आयोगाकडून चाप काँग्रेसकडून MERC च्या निर्णयाचे स्वागत

मुंबई : प्रतिनिधी अदानीच्या वाढीव वीजदराचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार नाही असे निर्देश वीज नियामक मंडळाने देऊन वीज ग्राहकांना मोठा दिलासा आहे. कोळसा खरेदीचा अतिरिक्त भार वीज ग्राहकांच्या माथी मारला जात होता. याप्रकरणी महावितरणने अदानीविरोधात केलेल्या तक्रारीवर वीज नियामक आयोगाने हे निर्देश दिले असून अदानीच्या मनमानी कारभाराला ही सणसणीत चपराक …

Read More »

वीज ग्राहकांना दिलासा: तक्रारी एका दिवसात निकाली काढण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामकआयोगाने घेतली दखल

मुंबई : प्रतिनिधी वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला …

Read More »