Breaking News

Tag Archives: mahatma phule jan arogya yojana

एक महिना उशीराने जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ५ लाखाचे कवच मिळाले महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लक्ष रूपयांवरून ५ लक्ष रूपये एवढे करण्याचा निर्णय २८ जून, २०२३ रोजी …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री तानाजी सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन …

Read More »

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश, राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करा

केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान …

Read More »

…तर रूग्णालयांवर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा …

Read More »

महात्मा फुले जनारोग्य योजनेचा फायदा बेळगावात ही मिळणार आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : प्रतिनिधी सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला …

Read More »