Breaking News

Tag Archives: maharashtra

महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त  जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु 

महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके मोठ्या संख्येने आजारी असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ० ते १८ वयोगटातील ९ लाख ६४ हजार ३८४ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने …

Read More »

अशोक चव्हाण यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

बिहार राज्याने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के केली आहे, बिहार भाजपानेही याला पाठिंबा दिला असून आता महाराष्ट्रात देखील बिहारप्रमाणे आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण म्हणाले, बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक कालच मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील ही मागणी होवू लागली …

Read More »

राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार

मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …

Read More »

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दोलायमान, शासनाचे कर्ज रोखे विक्रीस दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३३ च्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार …

Read More »

महाराष्ट्र काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम …

Read More »

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ? ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱयांचा डब्बा जड जातोय

महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसची टीम जाहिरः महाराष्ट्रातून या दोघांचा समावेश मल्लिकार्जून खर्गे यांनी शशी थरूर आणि ए के अॅथोनी यांना दिली पुन्हा संधी

साधारणतः नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात लोकसभा निवडणूकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सर्वच राजकिय पक्षांनी गृहित धरली आहे. तर दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ला आपणच पंतप्रधान पदावर पुन्हा निवडूण येणार असल्याचे जाहिर केल्याने देशभरातील सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली. यापार्श्वभूमीवर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर …

Read More »