Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत आमच्या आया-बहिणीची थट्टा होणार असेल आणि त्या सुरक्षित नसतील तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंटीवार …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या कोपरखळीने सभागृहात उडाला हास्यकल्लोळ फास्टॅग कोणाला लावायचा आमदारांना कि गाडीला?

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे गंभीर स्वरूपाचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. मात्र एखादा प्रसंग घडला किंवा कोणी त्यांची टोपी उडविली तर त्यास हसून दाद ही देतात. परंतु कधी स्वतः कोणाची खिल्ली किंवा टोपी उडविण्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र आज त्यांनी केलेल्या …

Read More »

भाजपाच्या या आमदाराने गॅलरीतून केला उडी मारण्याचा प्रयत्न मंत्री एकनाथ शिंदेंच्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदाराचा आततायीपणा

मुंबईः प्रतिनिधी विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी उपस्थित केलेल्या प्रश्नाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान न झाल्याने भाजपाच्या आमदाराने विधानसभा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदाराच्या या प्रयत्नामुळे संपूर्ण सभागृह हादरून गेले. आर्णी नगरपरिषदेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणाशी संबधित असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित भाजपाचे आमदार संदीप …

Read More »

वैधानिक महामंडळावरून अजित पवार विरुध्द फडणवीस-मुनगंटीवार आमने सामने विरोधकांची अजित पवारांवर टीकेची झोड

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यापालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना आणि निधीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी ती १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वैधानिक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे उत्तर देताच संतापलेल्या फडणवीसांनी बघु …

Read More »

शेलारांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कान बधीर झाले विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने विरोधकांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे …

Read More »

दोन वर्षात ७२ हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यातील ३६ हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना …

Read More »

सिंह आणि वाघ एकत्र : दोघांच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या मूषक पूराणाला उत्तर

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. आणि असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात २०१९ मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पूराणावर पलटवार केला. विरोधी पक्षनेते …

Read More »

मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना …

Read More »

आणि मंत्री देशमुखांचे आव्हान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्विकारले नाही तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्विकारण्याची दोन्ही नेत्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर माझे घर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. मात्र मी सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे. माझ्या कामातून मी सर्व कारखाने उभे केले. तुम्ही सत्तेत होतात. मी नव्हतो. त्यामुळे मी सरकारी योजनेतला एकही पैसा न घेता सर्व उद्योग उभा केलाय. तुम्ही दाखवून …

Read More »

न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी लवकरच निकाल म्हणून आम्हीही मोठा वकील परवडत नसताना लावल्याचे मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी न्यायमूर्ती लोया मृत्यू संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचं म्हणणं संपलं आहे. ही केस क्लोस टू ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लवकरच येणार असून या खटल्यात विरूध्द बाजूने महागडे वकील लावण्यात आल्याने राज्य सरकारच्यावतीनेही फि परवडत नसताना मोठा वकील लावण्यात आला असल्याचे सांगत न्या.लोया यांच्या मृत्यू संदर्भात …

Read More »