Breaking News

Tag Archives: forest minister

वाघ-बिबट्यांचे हल्ले, गावांना साळखी कुंपण घालण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी साखळी कुंपनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, …

Read More »

गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट, ३ वाघ आणि बिबट्याचा मृत्यू कोंबडीमुळे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना

वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांना चिंता वाढत्या वाघ आणि बिबट्यांच्या संख्येची वनांचे रक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत शासन गंभीर असून पीक नुकसान भरपाई मर्यादा ६००० वरून ५० हजार रुपये करण्यात आली तर वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आता २५ लक्ष रुपये मदत शासनाकडून दिली जात असून वनांचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी …

Read More »

वनमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा, व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प हत्ती संवादकाची मदत घेणार

राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील …

Read More »

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ५० कोटी वृक्ष लागवडीची जगाने दखल घेतली व्हिजन २०४७ शिखर संमेलन-पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे

मानवी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बिघडले असून पर्यावरणात बदल होत आहेत. एकविसाच्या शतकात ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. ‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ मध्ये जे विचारमंथन होत आहे, ते प्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या कानाकोपऱ्यात जनचळवळीच्या स्वरुपात पोहोचणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन वन, सांस्कृतिक …

Read More »

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून कोकणातील ३८८ गावे वगळणार पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून कोकणातील ३८८ गावे वगळणार

जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, रत्नागिरीतील ९८ गावे आणि कोकणातील ३८८ गावे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील …

Read More »

विदर्भातील “या” तीन जिल्ह्यात कृषी पंपाचे दिवसाचे भारनियमन रद्द

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर …

Read More »

मुनगंटीवारांची ग्वाही, अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता दावा मंजूर करणार

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्याने अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता आता अशा प्रकरणात तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे. संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वन कर्मचाऱ्यांनाही मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्य़जीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. …

Read More »