Breaking News

Tag Archives: flight will full capacity

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सवलत देताना त्यांना आणि प्रवाशांना कोविडशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये, विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणांमध्ये ७२.५ टक्के ऐवजी ८५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी दिली. यापूर्वी जुलैमध्ये तिकिटे ५० टक्के ऐवजी ६५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी होती. कोविड 19 रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी परदेशी उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण गेल्या वर्षी मे पासून ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त काही देशांसोबत ‘द्विपक्षीय हवाई बबल’ व्यवस्थेअंतर्गत जुलै २०२० पासून दोन्ही देशांदरम्यान परदेशी उड्डाण सेवा सुरू आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार, लोकांमध्ये हवाई प्रवासाची मोठी मागणी पाहता देशांतर्गत उड्डाण सेवांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. १८ …

Read More »