Breaking News

Tag Archives: dy chief minister

उद्योग विभागाचा रिन्यु पॉवर सोबत २० हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार

राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, …

Read More »

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण पुनर्विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय जारी इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय ३१ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, …और मुझे रास्ते बनाने का समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतर केले वक्तव्य

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास …

Read More »

अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …

Read More »

अजित पवारांचा हल्लाबोल, विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल सत्ता टिकवण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु

नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल …

Read More »

नाना पटोलेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खोचक टोला, राज्यात टाईमपास सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारकडे इच्छाशक्तीच नाही

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस सवाल, मग उध्दव ठाकरेही चोर मंडळाचे सदस्य ? विधान परिषदेत बोलताना फडणवीसांचा सवाल

संजय राऊतांनी आज कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. तसेच त्याचे पडसाद विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. विधान परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे हे सहन करण्यासारखं नाही. …

Read More »

अभिभाषणातून राज्यपाल रमेश बैस यांनी मांडली आपल्या सरकारची भूमिका, केल्या या मोठ्या घोषणा सीमावाद आग्रही भूमिका आणि नोकरभरतीवर भर

राज्य विधानमंडळाच्या, 2023 या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे सतत अनुसरण करीत आहे. …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …

Read More »