Breaking News

Tag Archives: Due to Price hike in crude oil possibility of again price increased in india on petrol and diesel and almost 3 to 4 rupees will rise

या गोष्टींमुळे पेट्रोल, डिझेल किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता कच्च्या तेलाने ७ वर्षांचा उच्चांक गाठला

मराठी ई-बातम्या टीम वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने ७ वर्षांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८७ डॉलरच्या पुढे पोहोचली आहे. यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये   कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलरच्या वर गेली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६८.८७ डॉलर होती. सध्या ही किंमत प्रति बॅरल ८६ डॉलरच्या वर पोहोचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवरून २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्चे तेल का महाग होत आहे? जग कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. याशिवाय मध्य पूर्वेतही तणावाचे वातावरण आहे. सोमवारी, संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळावर ड्रोन हल्ल्याने नवीन संकटाला जन्म दिला आहे, ज्याचा परिणाम तेल उत्पादनावर होण्याची अपेक्षा आहे. बाजारातील तज्ज्ञांचे  म्हणणे आहे की, या घडामोडींचा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या उत्पादनावर …

Read More »