Breaking News

Tag Archives: drought

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी.. .सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा वाढीव दुष्काळी महसूल मंडळांना सरकारने आर्थिक मदत करावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ जाहीर करतानाही सरकारचे राजकारण… ४० पैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांचे

राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी,… तातडीने दुष्काळ जाहीर करा शिक्षक, पोलीस दलासह विविध पदे रिक्त असताना सरकार भरती का करत नाही - अशोक चव्हाण

राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मंत्रिमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी तर मराठवाड्यात दुष्काळ सरकार बोलून रिकामे होणार आणि तोंडाला पाने पुसून जाणार

राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ? ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱयांचा डब्बा जड जातोय

महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »