Breaking News

Tag Archives: davos

अनिल देशमुख यांचा सवाल, मागील वर्षीच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले

दावोस दौऱ्यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र या करारामधून किती टक्के उद्योग महाराष्ट्रात येईल यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील वर्षी देखील मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्या नंतर २.५ लाख करोड रुपयांचे करार झाल्याचे म्हटले होते. मागील वर्षी झालेल्या करारा मधील …

Read More »

दावोसमध्ये २ दिवसात ३ लाख ५३ हजार कोटी गुंतवणूकीचे विक्रमी सामंजस्य करार

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून …

Read More »

दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार…

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या ७५ जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी?

महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या दावोस शिष्टमंडळाबद्दल असं कळतंय की, घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ५० लोकांचा वैयक्तिक ताफा घेऊन दावोस ला जात आहेत. ह्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि इतरही बरेच जण समाविष्ट आहेत. पती-पत्नी जास्तीत जास्त समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काहींसाठी, त्यांच्या मुलांना देखील ही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेतले जात आहे. जवळजवळ ७० लोक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, दावोसमधून १ लाख ३७ हजार पैकी ७६ टक्के…

दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, एकाबाजूला एसटीच्या पगारासाठी पैसे नाहीत अन… अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी ४० कोटी रुपयांची उधळपट्टी का

दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय, असा थेट सवाल उपस्थित करत ‘दावोस’च्या या अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या …

Read More »

प्रविण दरेकर यांचा आरोप, ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण

उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतताच म्हणाले, १ लाख ३७ हजार कोटींच्या कराराची अंमलबजावणी एक लाखांहून अधिकची रोजगाराच्या संधी मिळणार

दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील आणि १ लाखाहून अधिक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास, या कंपन्यासोबत करार दावोस मधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार

जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली. दावोस येथे पहिल्याच दिवशी …

Read More »