Breaking News

Tag Archives: cow

गायीवरून सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अशा याचिका दाखल का करता? याचिका कर्त्याला फटकारले न्यायालयाने

गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेमध्ये गायींचं संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती एस. एस. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी भारत सरकारसाठी गायींची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असल्याचा …

Read More »

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पी चर्म रोगाची …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाची मिळणार नुकसान भरपाई चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार

राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान …

Read More »

अजित पवार म्हणाले; गोवंश संवर्धनाचे काम करा, आवश्यक निधी देणार देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व …

Read More »

राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई

पदुमकडून शासन निर्णय जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी …

Read More »