Breaking News

Tag Archives: covid-19 test

सरकारी कंपनी सांगते कोरोना चाचणी ७९६ रू.त करा मात्र राज्याने १२०० रू. दर लावला खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने राज्याच्या आरोग्य खात्याने केली सुमारे २७० कोटींची लूट

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात जनतेच्या पैशाची कोटयावधी रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आज केली. कोरोनाच्या काळामध्ये जनतेला …

Read More »

टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र मुंबईची परिस्थिती वाईट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

नाशिक: प्रतिनिधी राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, …

Read More »

खाजगी आस्थापनांनो कोरोना टेस्ट करा नाहीतर कारवाईला सामोरे जा आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे असून अशी टेस्ट न खाजगी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखांना दिला आहे. कोरोनाबाधितांचे संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यास केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यानुसार राज्य …

Read More »

वैद्यकिय शिक्षण मंत्र्याचा ३८ हजार चाचण्यांचा दावा आरोग्य विभागाने ठरविला खोटा कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे सरकारच्याच प्रसिध्दी पत्रकातच उघडकीस

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यासाठी राज्यात १०० प्रयोगशाळांची स्थापना केली. या प्रयोगशाळांमुळे राज्यात प्रतिदिन ३८ हजार चाचण्या होत असल्याचा दावा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. परंतु प्रत्यक्षात १० लाखांमागे ७७१५ कोरोनाचाचण्या होत …

Read More »

कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये जाताय तर मग २५०० रूपयेच द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून नवी दर आकारणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. तसेच मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० …

Read More »

आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …

Read More »

सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात कोरोना चाचणी येणार (स्वस्त) खासगी प्रयोगशाळेसाठी सात दिवसात दर होणार निश्चित

मुंबई : प्रतिनिधी सध्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करायची असल्यास ४ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहेत. इतक्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण ही चाचणी करून घेण्यास धजावत नाहीत. तसेच उपचारासाठीही पुढे येत नाहीत. त्यामुळे अखेर या कोरोना चाचणीचे नव्याने दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची नव्याने समिती स्थापन केली असून आगामी …

Read More »