Tag Archives: bjp

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळा संपन्न

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची भाजपा सरकारच्या करंटेपणामुळे दुरवस्था-हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा

राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसाठी एसओपी तयार करा विधानसभेत दिली माहिती

महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती  एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत …

Read More »

आकाश फुंडकर यांची माहिती, गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दरम्यान दिली माहिती

गिग कामगारांसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता २०२० पारित करून त्याची अंमलबजावणी २१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली आहे. या संहितेत प्रथमच गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार आहे, असे कामगार मंत्री आकाश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता काँग्रेसच्या कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवार व लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा शानदार शुभारंभ

काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ' जावे विनोदाच्या गावा' विशेष कार्यक्रम

जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या …

Read More »

विमान अपघात प्रकरणी राज ठाकरे म्हणाले, एफआय़आरला सरकार का घाबरतंय रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती दिली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषदत घेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. तसेच मुंबई पुणे येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी एफआयआर घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यातच …

Read More »

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण १०० आणि ११२ या हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीवर पोहोचता यावे यासाठी घेतल्या गाड्या

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात …

Read More »