Breaking News

Tag Archives: ashadhi ekadashi wari

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण लाखो वारकऱ्यांना दिलासा

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू …

Read More »

पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवा

पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावे, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले. वारीच्या कालावधीत पंढरपूर …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, वारीतील प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्या अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान

पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या …

Read More »

समर्थकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळला नाव न घेता उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर साधला निशाणा

राज्यातील सत्तां संघर्षाच्या नाट्यानंतर जरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभार हाकायला सुरुवात केली. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपूरात शासकिय महापूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

पंढरपूर आषाढी वारीला सुविधा पुरविण्यासाठी नऊ कोटींच्या निधीस मंजुरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत …

Read More »

आषाढी वारीसाठी पंढरपूरला ‘या’ जिल्ह्यातून विशेष एसटी गाड्या आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या - परिवहन मंत्री अनिल परब

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. ६ ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ८ जुलै …

Read More »