Breaking News

Tag Archives: सोमनाथ सुर्यवंशी

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? परभणी प्रकरणी पोलीसांना कोंबिंग ऑपरेशन व लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत ?

परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही कृष्णा आधळे कुठे आहे त्याचा तपास काय

महाराष्ट्रातील हप्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी ताकदीने आम्ही सर्व लढणार असा निर्धार व्यक्त करत सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी …

Read More »

वंचितकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ लाख, तर वाकोडे कुटुंबियांना ५० हजारांची मदत फुले - शाहू- आंबेडकरी जनतेने सूर्यवंशी कुटुंबियांना मदत करावी

परभणी प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आहे. त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी- विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुंबईवर लाँग मार्च सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा राज्य सरकारची मदत नाकारली

परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना केल्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परभणी बंदचे आंदोलन पुकारले. मात्र याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी एलएलबी करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी ला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिस कस्टडीत असतानाच सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये विजय …

Read More »

धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, १५ तारखेपर्यंत न्याय द्या नाही तर… खंडणी प्रकरणातील आरोपीलाही मकोका लावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची टीका,… वाल्मिक कराडने पोलिसांनाच बिळात घातले सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून झाला, परभणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु

गुंडांना जात नसते, गुंडांना फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. वाल्मिक कराडने सीआयडीसमोर येण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला होता. तो शरण येणार हे माहित असून देखील पोलिसांनी नाकाबंदी केली नाही. आज पूर्ण देशात आपल्या पोलिसांची नाचक्की झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी …

Read More »

असा असणार राहुल गांधी यांचा परभणी दौरा…. सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. परभणी दौ-यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची …

Read More »

राहुल गांधी यांचा मराठवाडा दौराः परभणी आणि बीडमधील मस्साजोगला भेट देणार सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा , बीड परभणीतील मृतांना १० लाख रूपयाची नुकसान भरपाई बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, तर परभणी प्रकरणात न्यायालयीन चौकशी

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …

Read More »