अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व …
Read More »बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याला लीलावतीतून डिस्जार्च शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी सैफ अली खान ला रूग्णालयातून सुट्टी
१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत …
Read More »सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यास अटकः म्हणे तो बांग्लादेशीः ५ दिवसांची पोलिस कोठडी हल्ला करणाऱ्यास ठाणे येथील कासारवडवली येथून अटक
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर सैफ अली खान आणि सदर आरोपीची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर ६ चाकूचे वार झाले त्यामुळे जखमी झालेल्या सैफ अली खान याला मध्यरात्रीच रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान …
Read More »रक्ताने भिजलेल्या स्थितीत सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितली हकीकत रिक्षा चालक भजन सिंगने सांगितली त्या रात्रीची आखोंदेखी हालत
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने हल्ला केल्यानंतर रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान ज्या रिक्षाने लीलावती रूग्णालयात नेले. त्यावेळी सैफ अली खानची नेमकी स्थिती काय होती याची आखों देखी हालत सैफ अली खानला रूग्णालयात नेणाऱ्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग याने कथन केली. घटनेच्या दिवशी अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात …
Read More »सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजः एका संशयिताला घेतले ताब्यात संध्याकाळपर्यंत चौकशी करून पोलिसांनी दिले सोडून
सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन …
Read More »सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात लीलावती रूग्णालयाकडून महत्वाची अपडेट पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा काढला, तैमुर सोबत चालण्याचा प्रयत्न केला
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. तसेच त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये हल्लेखोराने हल्ल्याच्यावेळी वापरलेला चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या काल अडकला होता. मात्र आता तो तुकडा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आल्याची माहिती लीलावती रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने आणि सैफची शस्त्रक्रिया करणाऱ्या …
Read More »नाना पटोले यांची टीका, सैफ अली खानवरील हल्ला कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचे अपयश, निष्क्रीय फडणविसांनी गृहमंत्रीपद सोडावे
पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, त्या घटनेने मुंबई असुरक्षित म्हणता येणार नाही सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य
बांद्रा येथील पाली हिल येथे राहत असलेल्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ अली खान यांने त्या अज्ञात व्यक्तीस अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला. या घटनेनंतर राजकिय क्षेत्रातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी …
Read More »अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञाताकडून ६ वेळा चाकूने हल्लाः शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न
बांद्रा पाली हिल परिसरात राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर सहा चाकूने वार केले. त्यात सैफ अली खान याच्या शरीरारावर सहा ठिकाणी जखमा झाल्या. यातील दोन जखमा या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच सैफ अली …
Read More »