मालवण येथील राजकोट येथील ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमधील राड्यानंतर मुंबई शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने बैठक घेत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या तिन्ही नेत्यांनी शिवप्रेमीकडून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा …
Read More »शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, या पुतळ्याचे टेंडर न काढता त्यालाच कसे कंत्राट मिळाले? आपटे कोणी शोधला? नेव्हीला त्याची माहिती कोणी दिली? तो कल्याणचाच कसा?
मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उबाठा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना जयंत पाटील …
Read More »आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची
‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत …
Read More »मुंबई जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक संपली, पण निर्णय… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांच्या चर्चेला वेग
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागा वाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध जागांवर शिवसेना उबाठा गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून दावा करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाची कोंडी आज तरी निदान फुटू शकली नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा …
Read More »संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती
महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे. मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …
Read More »आशिष शेलार यांचा सवाल, नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याशी काँग्रेस, उबाठा सहमत आहे का? काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा, ३७० वे कलम पुन्हा लागू करू
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, आजचं आंदोलन हे विकृत विरूध्द संस्कृती… भरपावसात बदलापूरप्रश्नी शिवसेना उबाठाची सरकारच्या विरोधात निदर्शने
बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी स्थानिक बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात जनप्रक्षोभ बाहेर आला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यास अटकाव केला. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात काळ्याफिती आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनजवळ …
Read More »उद्धव ठाकरे यांची घोषणा, मी स्वतः तोंडाला काळी फित लावू बसणार जी तत्परता दाखविली, तशी न्याय देण्यातही दाखवा
बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली. परंतु राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकिय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत …
Read More »विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोर्टाची ती ऑर्डरच दाखविली मावळ मधील आरोपीला २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावल्याची दिला संदर्भ
बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बदलापूरचे आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बाहेरील लोक सहभागी झाले होते, तर स्थानिक लोक बोटावर मोजण्याइतके होते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणात राज्य सरकारने फाशी दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून …
Read More »